Jaipur Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरण; दोन आरपीएफ जवान सेवेतून बडतर्फ

Jaipur Mumbai Express Firing : ३१ जुलै २०२३ रोजी जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. आरपीएफ जवान चेतन सिंहने ३१ जुलैला आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये आरपीएफ जवानासह ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. काहीजण गंभीर जखमी झाले होते.  

ही घटना दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकांदरम्यान घडली होती. घटनेनंतर लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली  होती.

आता या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे. जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या दोन्ही आरपीएफ जवानांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांची सविस्तर चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरपीएफ जवान अमेय आचार्य आणि नरेंद्र परमार यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. हे दोन्ही जवान एक्सप्रेसमधील गोळीबाराचे प्रत्यक्षदर्शी होती. कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर चौकशीअंती या दोघांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कर्तव्य चोखपणे बजावलं नाही, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Pune University Traffic : गणेशखिंड रस्ता लवकरच घेणार मोकळा श्वास; हा पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती

प्रवाशांवर गोळीबार होत असताना एक जवान एक्सप्रेसमधील टॉयलेटमध्ये लपून बसला होता, तर दुसऱ्याने कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली होती, असा ठपका दोघांवर ठेवण्यात आला आहे. ३१ जुलैला एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह तिन प्रवाशांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह अटकेत आहे.

आरोपी चेतन सिंहचे मानसिक संतुलन बिघडलं होतं. यासाठी तो गेल्या ६ महिन्यांपासून उपचार घेत असल्याचे देखील चौकशीतून समोर आलं होतं. आता आरोपीची मनोवैज्ञानिक चाचणी केली जाणार होती. आरोपीने पोलिसांना तपासामध्ये सहकार्य केलं नसल्याची माहिती समोर आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply