Iqbal Singh Chahal : मोठी बातमी! इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

Iqbal Singh Chahal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आणि त्यानंतर प्रशाकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी इक्बाल सिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवलं. त्यानंतर इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकी आधी इक्बाल चहल यांना १८ मार्चला मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवलं होतं. चहल हे महाराष्ट्र कॅडरचे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. मागील अनेक वर्षात महाराष्ट्र सरकारच्या अनेक पदांवर काम केलं आहे.

PM Modi On Moscow Attack: रशियातील दहशतवादी हल्ल्याचा PM मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध; म्हणाले, रशियन सरकार...

चहल यांनी चार वर्ष ठाणे जिल्हाधिकारी पदावर काम केलं आहे. संभाजीनगरमध्येही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. यानंतर आता मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना काळात माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महत्वाची भूमिका निभावली.

इक्बालसिंह चहल यांनी गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिका आयुक्तपदाचं काम सांभाळलं. चहल हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर काम करण्यााआधी त्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदावर काम केलं. त्यांचा जन्म 20 जानेवारी 1966 झाला.

त्यांचं राजस्थानमधील जोधपूरमध्ये शिक्षण झालं. त्यांनी बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्तेत पहिलं स्थान पटकावलं होतं. तसेच त्यांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍स अॅण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक ही पदवी संपादित केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply