IPL2022: ड्युप्लेसिसचे धोनीच्या कॅप्टन्सीबाबत मोठे वक्तव्य

महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोडले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने अष्टपैलू रविंद्र जडेजाला आपला नवा कर्णधार घोषित केले. यावर आता चेन्नईच्या आजी माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, पूर्वाश्रमीचा सीएसकेचा सलामीवीर आणि सध्याचा रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार असलेल्या फाफ ड्युप्लेसिसने प्रतिक्रिया दिली आहे.

फाफ ड्युप्लेसिस म्हणाला की, 'मी धोनीला संघाचे नेतृत्व करताना खूप जवळून पाहिले आहे. धोनी कसा काम करतो हे पाहण्याची संधी मिळाली. यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो.' फाफ ड्युप्लेसिस बरोबरच आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील धोनीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, ड्युप्लेसिसने सांगितले की आरसीबीचा कॅप्टन झाल्यावर आपेक्षाचे ओझे असणारच आहे मात्र याची मला अडचण वाटत नाही. विराट कोहली , ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक सारखे खेळाडू संघात असल्यामुळे सामुहिक नेतृत्व ही संकल्पना राबवण्याचा फायदा मिळेल.ड्युप्लेसिस म्हणाला, 'विराट कोहली बराच काळ या देशाचा कर्णधार होता. भारतीय क्रिकेट आणि आरसीबीसाठी तो चांगला कर्णधार होता. त्यामुळे त्याचा अनुभव, ज्ञान आणि समज कोणापेक्षाही कमी नाही.'

फाफ पुढे म्हणाला की, 'ग्लेन मॅक्सवेलने देखील बऱ्याच सामन्यात विशेष करून टी 20 क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रणनिती बनवताना त्याच्या आयडिया खूप कामाला येतील. याचबरोबर दिनेश कार्तिक देखील संघात आहेच.'



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply