IPL 2024 Playoffs : प्लेऑफमध्ये कोणता संघ कधी अन् कोणाशी भिडणार? टाइम-तारखेसह जाणून घ्या सर्व अपडेट

IPL 2024 Playoffs Schedule : आयपीएलचा साखळी फेरीचा टप्पा रविवारी संपला. पावसाच्या व्यत्ययाने शेवट झाला. राजस्थान रॉयल्स-कोलकता नाईट रायडर्स यांच्यामधील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. कोलकताचा संघ २० गुणांसह पहिल्या स्थानावर कायम राहिला. राजस्थानला मात्र १७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

कोलकता-राजस्थान यांच्यामधील लढत पावसामुळे रद्द झाली, पण सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सला पराभूत करीत १७ गुणांची कमाई केली. राजस्थान व हैदराबाद यांनी समान १७ गुणांची कमाई केली, पण हैदराबादचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा चांगला असल्यामुळे त्यांना दुसरे स्थान मिळाले. आता क्वॉलिफायर वन लढतीत कोलकता-हैदराबाद हे संघ समोर येतील. तसेच एलिमिनेटर लढतीत राजस्थान-बंगळूर आमने-सामने येतील.

RCB Vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी

कोलकता व हैदराबाद यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावल्यामुळे आता त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी असणार आहेत. क्वॉलिफायर वन लढतीत पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. एलिमिनेटर लढतीतील विजेत्या संघासोबत त्यांना क्वॉलिफायर टू लढतीत खेळावे लागणार आहे. या लढतीत विजेता ठरलेला संघ अंतिम फेरीत क्वॉलिफायर वन लढतीत विजेत्या ठरलेल्या संघाशी दोन हात करील.

आयपीएल प्ले-ऑफ लढतींचे वेळापत्रक

२१ मे - कोलकता - हैदराबाद (क्वॉलिफायर वन) हा अहमदाबाद येथे संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल.

२२ मे - राजस्थान - बंगळूर (एलिमिनेटर) हा अहमदाबाद येथे संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल.

२४ मे - क्वॉलिफायर 2 - (क्वॉलिफायर वन लढतीतील पराभूत संघ व एलिमिनेटर लढतीतील विजेता संघ)

२६ मे - अंतिम सामना

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply