IPL 2024 Playoffs Scenario RCB : मुश्किल है पर नामुमकिन नहीं...! 'या' समीकरणामुळं RCBला मिळू शकतं प्लेऑफचं तिकीट

IPL 2024 Playoffs Scenario RCB : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एकामागून एक पराभवाचे धक्के बसत आहे. इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सलग सहाव्या सामन्यात बेंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यासह बेंगळुरूचा प्लेऑफसाठी पात्र होण्याचा मार्गही जवळपास बंद झालेला दिसत आहे. आरसीबीने या हंगामात आठ सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 7 सामने गमावल्यानंतरही बेंगळुरूला पात्र ठरण्याची संधी आहे. फक्त नशिबाने साथ दिली पाहिजे.

बंगळुरू 8 सामन्यांपैकी 1 विजयासह पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर म्हणजेच 10व्या नंबरवर आहे. कोणत्याही संघाला सहज पात्र होण्यासाठी 8 सामने जिंकणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ 14-14 सामने खेळणार आहे.

IPL 2024 : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज! संजूच्या राजस्थानशी सामना

बेंगळुरूने 8 सामने खेळले आहेत, म्हणजे आरसीबीकडे अजून 6 सामने खेळायचे आहेत. बेंगळुरूने हे सर्व 6 सामने जिंकले तरी ते केवळ 7 सामने जिंकू शकतील. यातला ट्विस्ट असा आहे की 7 सामने जिंकूनही संघ पात्र ठरू शकतो. मात्र, आता आरसीबीला पात्र ठरण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. जर एखाद्या संघाने 8 सामने जिंकले तर तो स्वतःच पात्र ठरतो, परंतु 7 सामने जिंकून पात्र ठरण्यासाठी नशिबाची गरज आहे.एकूण 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. सध्या या शर्यतीत राजस्थान रॉयल्स 7 सामन्यांपैकी 6 विजयांसह अव्वल स्थानावर आहे.

याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तिसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद 7 सामन्यांपैकी 5 विजयांसह आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज 7 सामन्यांपैकी 4 विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, लखनौ सुपरजायंट्स 7 पैकी 4 सामने जिंकून यादीत पाचव्या स्थानावर आहे.

जर बंगळुरूला पात्र ठरायचे असेल, तर पहिले तीन संघ पात्र ठरतील असे मानू या. आणि आरसीबीला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. यासाठी सीएसके आणि एलएसजीला त्यांचे 7 सामने जिंकण्यापासून रोखावे लागेल.

सीएसके आणि एलएसजी या दोन्ही संघांचे ७-७ सामने बाकी आहेत. जर या दोन्ही संघांनी जास्तीत जास्त 2-2 सामने जिंकले आणि उर्वरित 5 सामने गमावले आणि RCBने सर्व सामने जिंकले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.

गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स देखील यात थोडा ट्विस्ट देऊ शकतात. यासाठी फॉर्म्युला एकच आहे की जर या संघांनी 6 पेक्षा जास्त सामने जिंकले तर त्याचा फायदा आरसीबीला मिळेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply