IPL 2024 Playoffs Scenario : दिल्लीच्या आशा जिवंत! प्लेऑफचे समीकरण पुन्हा बदललं; 'हे' संघ बाहेर

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल 2024 मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याने गुणतालिकेत चांगलीच चुरस निर्माण झाली असून त्यामुळे प्लेऑफचे चित्र थोडे अधिक स्पष्ट झाले आहे.

दिल्ली कॅपिटल्सला या विजयाचा खूप फायदा झाला असून ते सहाव्या स्थानावर आले आहेत. त्याचे आता 8 गुण झाले आहेत. तर गुजरात टायटन्स संघ सातव्या स्थानावर आहे. त्यांचे सुद्धा फक्त 8 गुण आहेत. पण नेट रन रेटमुळे ते दिल्लीच्या मागे आहेत.

राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स टॉप-4 मध्ये आहेत. तर आरसीबी आणि पंजाब हे तळाला आहेत आणि ते जवळपास बाहेर गेले आहे.

RCB कडे शेवटची संधी... आज हरली तर IPL मधून जाणार बाहेर; धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराबादशी सामना

दिल्ली कॅपिटल्सच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्जला धक्का बसू शकतो. सीएसके सध्या पाचव्या स्थानावर असून दिल्ली त्यांच्या मागे सहाव्या स्थानावर आहे. जर सीएसकेची काही सामन्यात चांगली कामगिरी झाली नाही आणि दिल्लीने त्यांचे सामने जिंकले तर ते चेन्नई संघाला मागे टाकतील.

मुंबई इंडियन्स आठव्या स्थानावर आहे. आणि आता त्यांनाही प्रार्थना करावी लागेल की दिल्ली, चेन्नई आणि लखनौचे संघ चांगली कामगिरी करू नयेत, जेणेकरून पुढील काही सामने सलग जिंकून त्यांना टॉप-4 च्या आशा जिवंत ठेवता येतील.

मात्र, यासाठी मुंबई इंडियन्सला त्यांच्या उर्वरित 6 पैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी पंजाब किंग्ज प्ले ऑफमधून बाहेर पडणार हे आता निश्चित झाले आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या आशा उंचावल्या

या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर त्यांनी पुढील 4 सामने चांगल्या नेट रनरेटने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये जाऊ शकतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply