IPL 2023: IPLचा पहिला सामना रद्द? गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यावर काळे ढग

IPL 2023 : क्रिकेटविश्वातील खेळाडूंसाठी आणि जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींसाठी सर्वांत उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएलचा १६ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यावर काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांची पहिल्याच दिवशी निराशा होणार. 

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. त्याआधी वाईट बातमी समोर आला आहे.

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र, सामन्यावर पावसाचे दाट संकेत आहेत. काल 30 मार्च रोजी संध्याकाळी उशिरा अहमदाबाद आणि स्टेडियमच्या आसापासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरु होण्याआधी गुजरातचे खेळाडू हे सराव करत होते.

मात्र पाऊस आल्याने खेळाडू आडोशाला निघून गेले. गुजरात टायटन्सने पावसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गुजरातचा कोच आशिष नेहरा पावसाची मजा घेताना दिसतोय.

त्यामुळे सामन्याच्यावेळी पाऊस येणार का अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादमध्ये तापमान हे 29 ते 32 अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. पण 30 मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे चाहत्यांच्या मनात सामना रद्द होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply