IPL 2022 : CSK ची नवी जर्सी पाहिलीत का?

IPL CSK 2022 : इंडियन प्रीमियर लीगचे (IPL ) कप चार वेळा जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 26 मार्च रोजी खेळणार आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने त्यांची नवीन जर्सी लाँच केली आहे.(Chennai Super Kings New Jersey) चेन्नई सुपर किंग्ज (CSK New Jersey) ने लाँच केलेल्या जर्सीत अनेक नवीन गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. संघाच्या लोगोच्या समोर चार तारे लावण्यात आले आहेत, जे चार वेळा ट्रॉफी दर्शवितात. याशिवाय खेळाडूंना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी खांद्यावर नवीन डिझाइन करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या जर्सीत फारसा बदल केलेला नाही. फक्त जर्सीचा स्पॉन्सर बदलण्यात आला आहे, यावेळी जर्सीच्या पुढील बाजूस TVS Eurogrip लोगो आहे . 2021 मध्येच, चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या जर्सीत भारतीय सैन्याला श्रद्धांजली देत, खांद्याच्या भागामध्ये सैन्याच्या डिझाइनचा एक भाग जोडला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची गणना स्पर्धेतील सर्वोत्तम संघांमध्ये केली जाते. चार खिताब तसेच अनेक वेळा प्लेऑफ आणि फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. एमएस धोनी यावेळीही आपल्या संघाची कमान सांभाळणार आहे. चेन्नई यंदाच्या हंगामात आपल्या पाचव्या विजेतेपदासाठी जोर लावेल.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply