IPL 2022 : यंदाची आयपीएल कोण जिंकणार? गावसकरांनी केली भविष्यवाणी

मुंबई, 25 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या मोसमात 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत, त्यामुळे खेळाडूंचा मेगा ऑक्शनही घेण्यात आला. लिलावानंतर आता बरेच खेळाडू नव्या टीमकडून खेळताना दिसणार आहेत. लिलावानंतर अनेक टीमची ताकद वाढली आहे, तर काही टीमच्या कमकुवत बाजूही समोर आल्या आहेत, त्यामुळे यंदा कोणती टीम आयपीएल जिंकणार, याबाबत क्रिकेट पंडित आणि चाहते मत मांडत आहेत. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्या मते यावेळी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकू शकते.

रोहित शर्माकडे सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, असं भाकीत गावसकरांनी इंडिया टुडेसोबत बोलताना केलं. 'रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीमध्ये मुंबई पुढे जाऊ शकते, त्यांच्याकडे रेकॉर्ड सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. मॅच कशी जिंकायची, हे मुंबईच्या टीमला माहिती आहे, त्यामुळेच त्यांनी आधीही हरलेल्या मॅच जिंकल्या आहेत. प्रत्येक मोसमात ते संथ सुरूवात करतात, पण यावेळी टीमची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त वेळ असेल,' अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.

'मुंबईकडे रोहित शर्मासारखं नेतृत्व आहे, जो उत्कृष्ट बॅटिंग करू शकतो. तसंच जसप्रीत बुमराहसारखा बॉलरही आहे. मुंबईने पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं.

मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, पण मागच्या मोसमात टीमची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सना प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नव्हता. यंदा मात्र मुंबईने टीममध्ये मोठे बदल केले आहेत. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक आणि ट्रेन्ट बोल्ट या दिग्गज खेळाडूंशिवाय मुंबई मैदानात उतरणार आहे.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply