IPL 2022 : मुंबई इंडियन्सची आज लखनऊ सुपर जायंट्सशी टक्कर; विजयाचे खाते उघडणार?

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या (IPL 2022) हंगामातील पहिल्या विजयाच्या शेधात असलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरोधात आज दुपारी 3.30 वाजता मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियममध्ये (Brabourne stadium) रंगणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा विजेतेपदाची मोहोर लावणाऱ्या मुंबईची यंदाच्या मोसमात मात्र निराशाजनक कामगिरी झालीय. सलग पाचवेळा प्रतिस्पर्धी संघांसोबत पराभव झाल्याने मुंबई लखनऊ विरोधाल विजयाचं खातं उघडणार की पराभवाचा सिक्सर त्यांच्या पदरात पडेल, असा प्रश्न मुंबईच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, मुंबईचने आतापर्यंत बेब्रॉन स्टेडियमवर खेळलेल्या आठ सामन्यांपैकी सहामध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे बेब्रॉनचं पिच मुंबईसाठी लकी मानला जातो.

आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत मुंबई १.०७२ नेट रनरेटमुळे खालच्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबईला आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. परंतु, लखनऊ संघानेही चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात २१० धावांचं लक्ष्य पार करत बेब्रॉन स्टेडियमवर विजय मिळवला होता. त्यामुळे लखनऊसाठीही हा मैदान लकी ठरु शकतो.

आपल्याच खेळांडूंचं मुंबईला आव्हान

लखनऊ सुपर जायंट्सचे स्टार खेळाडू क्रुणाल पंड्या आणि क्विंटन डिकॉक यापूर्वी झालेल्या आयपीलसाठी मुंबईसोबत खेळले होते. त्यामुळे मुंबईसमोर आपल्यासोबत खेळलेल्या आक्रमक खेळाडूंचं मोठं आव्हान आहे. लखनऊच्या टॉप ऑर्डरमध्ये कर्णभार के एल राहूल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तसंच मिडल ऑर्डरमध्ये दिपक हुड्डाने गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी करत धावा कुटल्या आहेत. आयुफ बदोडी यानेही यापूर्वी प्रतिस्पर्धी संघासोबत झालेल्या सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे मुंबईला लखनऊविरोधात सामना जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, कायरन पोलार्ड, डेनियल सॅम्स, मयंक मार्कंडे, टायमल मिल्स, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, दीपक हूडा, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवि बिश्नोई, आवेश खान.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply