International Women's Day : महिला नेतृत्व करत असलेली ‘ईपिरॉक कंपनी’

 

International Women's Day : संपूर्ण कंपनीचे महिला नेतृत्व करत असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मल्टिनॅशनल कंपनी ईपिरॉक मायनिंग कंपनीला भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयातर्फे इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट सर्विसेस पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कंपनीचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी व अधिकारी महिला आहे.

१८ मार्च १९७१ला सातपूर एमआयडीसीमधील भूखंड केवळ सहा रुपये प्रतिचौरस मीटर दराने तत्कालीन मालक के. एम. मॅथ्यू व यांच्या सीपी टूल या कंपनीला देण्यात आला होता. पुढे कंपनीने टप्प्याटप्याने भूखंडाचा विकास केला आणि आपली सीपी टूल या नावाने ओळख निर्माण केली.

   

 

Nanded News : हदगाव तालुक्यातील ८ ते १० गावांमधील नागरिकांना विषबाधा

त्यानंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने स्वीडिश अॅटलॉस कॅप्को या कंपनीनेने १८ मे २००४ ला नाशिकमधील सीपी टूल कंपनी टेकओवर केली आणि या कंपनीतील कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांची लाइफस्टाइलच बदली. मायनिंग क्षेत्रातील लागणाऱ्या मशिनचे टूल बनविणाऱ्या या कंपनीने नाशिकमधून पाय जगभरात पसरले. 

कंपनीने २७ डिसेंबर २०१७ ला ईपिरॉक मायनिंग इंडिया असे नामकरण करत एक दमदार उत्पादनाला सातपूरमधूनच सुरवात केली. कंपनीचे एमडी ‘मेडी चे’ या  महिलाहोत्या. डिसेंबरपर्यंत त्यांनी धुरा सांभाळली. जनरल मॅनेजर कॅथरिना कोलकीग या स्वीडिश महिला आहेत. तसेच नाशिक प्रकल्पाचे वरिष्ठ एचआर व्यवस्थापक पल्लवी पांडे आहेत.

सध्या नाशिक प्रकल्पात पन्नासपेक्षा जास्त महिला इंजिनिअर व टेक्निशियन काम करत आहेत, ही महिलांसाठीच नव्हे तर नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. खडतर प्रवास करून या कंपनीने आज जगात वेगळी ओळख निर्माण केली. या कंपनीत मॅनेजमेंट मंडळात चार महिला संचालिका आहे, त्यांचा सिंहाचा वाटा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply