Indian Navy Rescue Hijacked Ship : भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या जहाजाची केली सुटका

Indian Navy Rescue Hijacked Ship : अरबीसमुद्रात 'एमव्ही लिली नॉरफोक' या जहाचंच गुरुवारी सोमालीन चाच्यांकडून अपहरण करण्यात आलं होतं. या जहाजावर १५ भारतीयासह २१ जण होते. दरम्यान भारतीय नौदलाने या सोमालीन चाच्यांतावडीतून या जहाजाची आणि त्यावरील २१ जणांची सुखरूप सुटका केली आहे. भारतीय नौदलाची आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात अमेरिकच्या जहाजाची भारतीय नौदलाने सुटका केली होती.

एमव्ही लिली नॉरफोक या जहाजाचं सोमालीयानजीक उत्तर अरबी समुद्रात अपहरण  झालं होतं. भारतीय नौदलाला याची माहिती मिळताच तातडीन समुद्रारून आणि हवाईमार्गे कारवाईला सुरुवात केली. भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर जहाजापर्यंत पोहेचलं. त्यानंतर जहाजाची टेहळणी करण्यात आली. त्यानंतर नौदलाची जहाजापर्यंत पोहोचल्यानंतर चाच्यांनी गोळीबार केला आणि आडोशाला लपून बसले. नौदलाचे जवान जहाजावर पोहोचले तेव्हा चाच्यांनी तेथून पळ काढला होता.
 
नौदलाच्या कमांडोंनी जहाजात प्रवेश केला आणि १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका केली. दरम्यान नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही जहाजाच्या तपासणीचे काम सुरू आहे. नौदलाचे प्रमुख आर. हरी कुमार यांनी अरबी समुद्रात तैनात असलेल्या नौदलाला समुद्र चाच्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply