India vs Srilanka Match Result: नाद करा पण आमचा कुठं! लंकेची विजयी मालिका मोडत टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

India vs Srilanka Match Result : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील सुपर ४ सामना पार पडला. या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने ४१ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव बनवून ठेवला होता.

मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीतील स्थान देखील निश्चित केलं आहे.

IND Vs SL, Asia Cup 2023: मुंबई लोकल बनली बुलेट ट्रेन! स्लोवेस्ट २००० ते फास्टेस्ट १०००० धावा, रोहितची विक्रमी कामगिरी

भारतीय संघाने दिलं २१४ धावांचं आव्हान..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाची सुरुवात करताना शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. तर कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज देत ५३ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान ७ चौकार आणि २ षटकार मारले. तर केएल राहुलने ३९ आणि ईशान किशनने ३३ धावांची खेळी केली. शेवटी अक्षर पटेलने २६ धावांची बहुमूल्य खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या ४९.१ षटकात २१३ धावांपर्यंत पोहचवली. 

लंकेचा विजयरथ थांबला...

या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवण्यासाठी २१४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव देखील डगमगला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स घेत सामन्यात दबदबा बनवून ठेवला. शेवटी गोलंदाजीत नडणारा वेलालागे फलंदाजी करतानाही भारतीय संघाला नडला.

वेलालागे आणि धनंजय डी सिल्वाने अर्धशतकी भागीदारी करत श्रीलंकेला या सामन्यात जिवंत ठेवलं होतं. धनंजय डी सिल्वा ४१ धावा करत माघारी परतल्यानंतर भारतीय फॅन्सच्या जीवात जीव आला. मात्र वेलालागे फेविकॉलसारखा चिपकुन राहिला.

त्याने ५ गडी बाद करण्यासह नाबाद ४२ धावांची खेळी केली. मात्र श्रीलंकेचा संघ विजयापासून ४१ धावा दूर राहिला. यासह भारताने अंतिम फेरीतील स्थान जवळ जवळ निश्चित केलं आहे. तर श्रीलंकेचा विजयी रथ थांबला आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply