IND vs NZ : एकच नंबर! अय्यर-विराटने वानखेडे मैदान गाजवलं, न्यूझीलंडसमोर उभारला 397 धावांचा डोंगर

IND vs NZ : मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंडमध्ये हाय वोल्टेज सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून टीम इंडियाच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला 398 धावांचं आव्हान दिलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी खेळी खेळत ५० षटकात चार गडी गमावून ३९७ धावा चोपल्या. भारतासाठी विराटने ११७ धावांची खेळी खेळली.

Virat Kohli Century : विराट 'विक्रमादित्य'! सचिन तेंडुलकरसमोरच मोडला सर्वाधिक शतकांचा विक्रम, वनडेत सर्वाधिक ५० शतके

विराटने शतकी खेळी करत सचिन तेंडुलकरचा वनडे फॉरमॅटमधील शतकांचा विक्रम मोडला. विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये ५० शतक ठोकत नवा विक्रम केला आहे. सचिनच्या नावावर ४९ शतक आहेत. 

या सामन्याच्या डावात श्रेयस अय्यरने १०५ धावांची दमदार खेळी खेळली. तर रोहित शर्मानेही ४७ धावा काढल्या. रोहित शर्मा आणि गिलने पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माने २९ चेंडूत ४७ धावा काढल्या. शुभमन गिल ७९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. या सामन्यात विराटने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply