Ind vs Ire T20 WC24 : 5 जूनला भारत-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द तर... कोणाला होणार फायदा?

India vs Ireland T20 World Cup 2024 : आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाचा पहिलासामना आयर्लंड विरुद्ध 5 जून रोजी अमेरिकेतील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजपर्यंत या मैदानावर एकही सामना खेळला गेला नाही. या मैदानावर भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला सामना होणार आहे.याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पण अमेरिकेत आता काही ठिकणी पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक सराव सामनेही रद्द करण्यात आले आहेत, अशा परिस्थितीत भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर निकाल काय लागेल.

पाऊस पडला तर फायदा कोणाला ?

आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला सामना भारताला आयर्लंड विरुद्ध खेळायचा आहे. टीम इंडिया टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर वन टीम आहे, तर दुसरीकडे आयर्लंडही टॉप-10 च्या बाहेर आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द झाला तर टीम इंडियाचे नुकसान होणार आहे.पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. म्हणजेच सामना त्याचा फायदा आयर्लंडला होईल. कारण भारताने त्यांना कसेही हरवले असते, पण जर पाऊस पडला तर त्यांना फ्री पॉइट मिळेल.

T-20 World Cup IST Timings : टी २० वर्ल्डकप सामने बघायचेत? तर उडेल झोप! पाहा किती वाजता सुरु होतील सामन

आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 आजपासून म्हणजेच 2 जूनपासून सुरू झाला आहे. तत्पूर्वी काल भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे.प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात ऋषभ पंतने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. याशिवाय हार्दिक पांड्यानेही 40 धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताची धावसंख्या 182 पर्यंत पोहोचली. बांगलादेशला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि 60 धावांनी पराभव पत्करावा लागला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply