India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा

India Pakistan War : पहलगान हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवताना दिसत आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील ९ दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. त्यानंतर देखील पाकिस्तान शांत बसायचे नाव घेत नसल्याने भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढत चालला आहे. अशातच अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेने मोठी भूमिका घेतली आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी वेन्स यांनी भारत- पाकिस्तान संघर्षाबाबत मोठं विधान केले आहे. पाकिस्तान अमेरिकेच्या माध्यमातून भारताला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यांनी पाकिस्तानलाच खडेबोल सुनावले आहेत. जे.डी. वेन्स यांनी भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील अंतर्गत वाद आहे. अमेरिका यामध्ये पडणार नाही.', असे म्हणत त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.

 

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर सुरूच; पाकिस्तानमधील आणखी १२ ठिकाणं टार्गेटवर

वेन्स यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे देखील सांगितले की, 'अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना शांतता राखण्यासाठी प्रोत्साहित करू शकते. मात्र ज्या वादाशी आमचा थेट संबंध नाही त्या वादामध्ये पडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही दोन्ही देशांना संघर्ष न करण्याचे आदेश देऊ शकत नाही. आमचा मार्ग केवळ राजनैतिक चर्चेचा असेल.' भारत-पाकिस्तान संघर्षावर अशी प्रतिक्रिया देत वेन्स यांनी यातून हात बाहेर काढून घेतले.

अमेरिकेने हे देखील स्पष्ट केले आहे की, ते भारताच्या त्या भूमिकेचे समर्थन करते ज्या अंतर्गत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. वेन्स असे देखील म्हणाले की, 'भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाशी आमचा मुळात काहीही संबंध नाही. जरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांना तणाव कमी करण्यास सांगत आहेत. आम्ही या दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु आपण युद्धाच्या मध्यभागी अडकणार नाही. आमचा यामध्ये मुळात काहीही संबंध नाही. हा आमचा विषय नाही. आपण आशा करूया की हे अणुयुद्धात रूपांतरित होणार नाही.'

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply