India Heat Wave Update: सूर्य आग ओकतोय! देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसवर

India Heat Wave Update : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वाढत चालाला आहे. कडाक्याचे ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून ती कायम राहण्याची शक्यता आहे. अशातच भारतातील हवामान खात्याने (IMD) देशभरातील वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. भारतातील विविध भागात तीव्र उष्णता राहिल आणि तापमान साधारणत: 44 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हवामान खात्याने (Weather Department) पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि पूर्व झारखंडमध्ये कमाल तापमानाचा परिणाम होण्याचा इशारा दिला आहे. हवामा खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागांमध्ये 3 मे पर्यंत तीव्र उष्णता जाणवेल. ज्याची तीव्रता पुढील तीन ते चार दिवसांत कमी होईल. दक्षिण आंध्र प्रदेशात वेगवेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवस तीव्र उष्णता राहिल. त्यानंतर या ठिकाणी आणखी दोन ते तीन दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहिल.

 

तेलंगणा, कर्नाटक आणि किनारी आंध्र प्रदेशला पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये 3 मे रोजी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती जाणवण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांवर 3 ते 6 मे आणि मराठवाड्यात 3 ते 5 मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र यासारख्या किनारपट्टी भागातील नागरिकांना पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय छत्तीसगडमध्ये 3 मे रोजी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 3 ते 6 मे या कालावधीत रात्री गरम वातावरण राहिल.

एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे हवानाम खात्याने अनेक राज्यांमध्ये पावसाचा देखील इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह ईशान्येकडील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय सिक्कीम, ओडिशा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्येही हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply