टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2026 मधील मजबूत संघ मानला जातो. पण काल या टीमला टुर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हा वर्ल्ड कप खेळतेय. सुपर-8 राऊंडचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. या मॅचमध्ये भारताचा 76 धावांनी पराभव झाला. टी20 वर्ल्ड कपमध्ये रन्सच्या हिशोबाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवाने टीम इंडियाच्या सलग विजयाच्या सिलसिल्याला ब्रेक लावला. उलट टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग अधिक खडतर बनवला. टीम इंडियाला आता उलट सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकावेच लागतील. त्यानेही भागणार नाही.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 22 फेब्रुवारीला भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना झाला. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बाबतीत टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर फार काही चाललं नाही. गोलंदाजांनी टीमला चांगली सुरुवात दिली तसचं नंतर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीला लगाम घातली. दक्षिण आफ्रिकेने 187 धावा केल्या. वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून टीम इंडियाच्या बॅटिंगमध्ये पाहिजे तसा दम दिसलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर फलंदाजीची पोल-खोल झाली. टीम इंडियाचा डाव 111 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेने एका मोठ्या विजयाची नोंद केली.
सेमीफायनलच तिकिट कसं मिळणार?
या एका मॅचच्या निकालाचा सेमीफायनल प्रवेशावर परिणाम होणार आहे. टीम इंडिया एक पराभवासह करो या मरोच्या स्थितीत आहे. सुपर-8 राऊंडमध्ये प्रत्येक टीमला 3-3 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने आपला पहिला सामना गमावलाय. आता सेमीफायनलच तिकिट कसं मिळणार?. असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. पहिलं म्हणजे टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकावेच लागतील. टीम इंडियाचा पुढचा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध आणि शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 4 पॉइंट्स होतील.
दुसऱ्या टीम्सनी किती सामने गमावणं आवश्यक?
पण हे सर्व इतकं सोपं नाहीय.भारत आता अशा स्थितीत आहे की, फक्त जिंकून भागणार नाहीय, तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या तीन टीम पैकी कुठल्या दोन टीम्सनी 2-2 सामने गमावले पाहिजेत. अशावेळी टीम इंडियाचे 4 पॉइंट होतील. अन्य एका टीमचे 4 किंवा 6 पॉइंट होतील. अशा स्थितीत टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग सुकर होईल.
दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट किती?
भारताशिवाय अन्य दोन टीम्सचे 4-4 पॉइंट झाले तर सेमीफायनल प्रवेशासाठी दुसऱ्या मार्गाने निर्णय होईल. ICC च्या नियमानुसार, पॉइंट्स बरोबरीत असतील तर जास्त मॅच जिंकणारी टीम पुढे जाईल. तिन्ही टीम्सचे 2-2 पॉइंट झाले तर पेच फसेल. नेट रनरेटनेही टीम इंडियाची अडचण वाढवली आहे. 76 धावांनी पराभव झाल्यामुळे भारतीय टीमचा नेट रनरेट -3.800 झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट 3.800 आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढचे दोन सामने फक्त जिंकायचेच नाहीयत, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.
शहर
- Pune : पुण्याच्या तरुणाची प्रेरणादायी कामगिरी; सिद्धेश लांबाते पहिल्याच प्रयत्नात CA फायनल उत्तीर्ण
- Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


