IND vs PAK CWC 2023 :  भारतासमोर पाकिस्तान झुकला! अवघ्या १९१ धावांवर पाडला खुर्दा

IND vs PAK CWC 2023 :  भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील रोमांचक सामना सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तान संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १९१ धावांवर संपुष्ठात आला आहे.

पाकिस्तानचा संघ १९१ धावांवर संपुष्टात..

या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या आमंत्रणाचा स्विकार करत पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र पाकिस्तानच्या सलामी जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. अब्दुल्ला शफिक २० तर इमाम उल हक अवघ्या ३६ धावा करत माघारी परतला.

सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानने पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. बाबर आझम ५० धावा करत माघारी परतला. तर मोहम्मद रिजवानने ४९ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply