IND vs NZ 3rd ODI: टीम इंडियाला नंबर-1 बनण्याची सूवर्णसंधी, आजच्या सामन्यात अशी असू शकते प्लेईंग-11

INDvsNZ 3rd ODI:  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज (24 जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवला होता. भारतीय संघाने आजचा सामना जिंकल्यास मालिका 3-0 अशी खिशात घातली जाईल. तिसरी वनडे जिंकून भारताला नंबर-1 होण्याची संधीही आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल.

ओपनर शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गिलने पहिल्या सामन्यात द्विशतक तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 40 धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मानेही दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते.श्रीलंकेविरुद्ध दोन आणि बांगलादेशविरुद्ध एक शतक झळकावणारा विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता, त्यामुळे त्याचे लक्ष्यही मोठा डाव खेळण्याचे असेल. 

टी-20 नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती पण मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करु शकला नाही. हार्दिक पांड्याही मधल्या फळीत पुरेसे योगदान दिलेले नाही. पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेला रजत पाटीदारही संघात आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन रजतला पदार्पणाची संधी देते की नाही हे पाहावे लागेल. पाटीदारने देशांतर्गत स्तरावर आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे.

उमरान मलिक खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. उमरान मलिकला मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराजच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकी गोलंदाजीत लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. वॉशिंग्टन सुंदरलाही प्लेइंग-11 मध्ये कायम राहण्याची अपेक्षा आहे.

संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

संभाव्य न्यूझीलंडचा संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply