IND vs BAN: पुण्यात २७ वर्षांनंतर वर्ल्डकपचा थरार! बांगलादेशचा नाणेफेक जिंकत बॅटींगचा निर्णय; पाहा प्लेइंग ११ पुण्यात

IND vs BAN : वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १७ वा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे

या सामन्यासाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या सामन्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की, शार्दुल ठाकुरच्या जागी मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. मात्र असं काहिच झालेलं नाही.

India Vs Bangladesh : टीम इंडियाची चिंता वाढली! भारत-बांगलादेश सामन्याआधी मोठी अपडेट, स्टार खेळाडूनं दुखापतीवर केली मात

 

बांगलादेश संघात मोठा बदल..

या सामन्यात शाकिब अल हसन खेळताना दिसून येणार नाही. त्याच्याऐवजी नजमुल हुसेन शांतो बांगलादेश संघाचे नेतृत्व करणार आहे. शाकिब अल हसन दुखापतग्रस्त असल्याची माहिती नजमुल हुसेन शांतोने दिली आहे. त्याच्यऐवजी नसुम अहमदला संघात स्थान दिलं गेलं आहे. तर तस्किन अहमदच्या जागी महमुदला संघात स्थान दिलं गेलं आहे. 

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

या सामन्यासाठी अशी आहे बांगलादेश संघाची प्लेइंग ११ लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply