Manipur Lok Sabha Campaign: मणिपूरमध्ये प्रचारातही भीतीचं सावट कायम! सार्वजनिक सभा नाही, इन कॅमेरा बैठकांवर भर

 

Imphal :मणिपूर गेल्या वर्षभरापासून प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहे. कुकी आणि मैतेई समाजातील रक्तरंजित संघर्षामुळं हे राज्य अद्यापही धुमसत आहे. याचाच परिणाम आता लोकसभा निवणुकीच्या प्रचारावरही दिसून आलं आहे.

एकीकडं देशभरात सर्व राजकीय पक्षांचा सार्वजनिक सभांचा धडाका सुरु असताना दुसरीकडं मणिपूरमध्ये फक्त इन कॅमेरा बैठका होत आहेत. सार्वजनिक सभांना अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.

उमेदवारांचे हे प्रमुख चेहरे

मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. यांपैकी एक अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघ तर दुसरा बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ हे आहेत. यांपैकी अंतर्गत मणिपूरमध्ये सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मैतेई समाजाचं प्राबल्य आहेत. सहा जणांमध्ये प्रमुख चेहऱ्यांपैकी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि माजी आयपीएस अधिकारी थोउनाओजम बसंता सिंह हे भाजपकडून तर जेएनयूचे प्राध्यापक बिमोल अकोईजोम हे नुकतेच राजकारणात दाखल झाले असून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर माहेश्वर थोनाऊजोम हे आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीचे तर आर के सोमेंद्र हे मणिपूर पिपल्स पार्टीचे उमेदवार आहेत. माहेश्वर आणि सोमेंद्र हे मणिपूरमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

Rats Eat Cannabis: पोलीस ठाण्यातील 19 किलो गांजा उंदरांनी केला फस्त, पोलिसांच्या युक्तीवादाने न्यायालय अवाक

जाहीर प्रचार नाहीच

दरम्यान, मणिपूरमधील सध्याच्या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या राज्यात प्रचारासाठी कुठल्याही सार्वजनिक सभा, पदयात्रा निघताना दिसत नाहीत. त्याचबरोबर राजकीय पक्षांची प्रचाराची पोस्टर्सही दिसत नाहीत. गर्दी करणाऱ्या या सर्व पारंपारिक प्रचाराच्या साधनांवर जणू अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.

पण उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इन कॅमेरा बैठकांचा आधार घेत आहेत. यामध्ये २० ते ५० जणांच्या गटाला घरातून किंवा पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या खासगी कार्यालयांमधून उमेदवारांशी चर्चा घडवून आणल्या जात आहेत. उमेदवारही विविध भागात कुलदैवतांची पूजा करून या इन कॅमेरा बैठकांना आपली उपस्थिती लावत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

मोदी-शहांचा प्रचार नाहीच

भाजपकडून देशभरात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांच्या सभांचा धडाका लावला इथंही यांनी यापूर्वी अशा पद्धतीच्या सभा घेतल्या आहेत. पण सध्या असं काहीही इथं पहायला मिळणार नाही. त्याऐवजी आम्ही इन कॅमेरा बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहोत, इथं सध्या कोणीही राष्ट्रीय नेते नाहीत, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहेत.

यंदाची परिस्थिती विचित्र

पातसोई भागातील स्थानिक लोक यंदाच्या निवडणुकीबाबत सांगतात की, सर्वसाधारणपणे आम्हाला कधीही लोकसभा निवडणुकीवेळी अशा प्रकारची चिंता वाटली नाही. विधानसभा निवडणुकांच्यावेळी खरी मजा असते. पण यावेळी सर्वचजण या निवडणुकांबाबत दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. एकही उमेदवार आमच्या भागात अद्याप प्रचारासाठी आलेला नाही. इथली जनता केवळ स्थानिक मीडियाच नव्हे तर राष्ट्रीय मीडिया बारकाईनं लक्ष ठेवून आहे, यामध्ये विशेषतः सोशल मीडियावर लोकांचं अधिक लक्ष आहे.

रात्रीच्या सुरु होतात बैठका

मीरा पायबिस या मणिपूरमधील मैतेई समाजाच्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्या इम्फाळच्या चंगामाखा भागात नाईट गार्ड म्हणून काम करत आहेत. रात्री ९ वाजता त्यांची ड्युटी सुरु होते. याच वेळेत ते रात्री साडेनऊ दहा नंतर काँग्रेस उमेदवारासाठी काम करणाऱ्या काही महिला त्यांना येऊन भेटतात. त्यानंतर पुढचे तास दोन तास स्थानिक महिलांच्या भेटी घेत, त्यांच्या शेजाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. याद्वारे त्या आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असून याद्वारे आम्हाला आमच्या उमेदवाराबाबत अधिक चांगल्या प्रकारे माहिती देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply