कल्याण : व्यावसायिकांनी पाट्या न बदलल्यास १२ तारखेनंतर त्यांचे बारा वाजवणार; मनसेचा आयुक्तांना इशारा

कल्याण : दुकाने आस्थापनांना प्रमुख नामफलक मराठीत लावण्याबाबतच्य सूचना पालिकेने दुकानदार आणि आस्थपनाना दिला होता. मात्र अद्याप बहुतांश दुकानांचे प्रमुख नामफलक इंग्रजीत दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर (साेमवार) कल्याण येथील मनसे  पदाधिका-यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. येत्या १२ तारखेपर्यंत दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत अन्यथा बारा तारखेनंतर बारा वाजवणार असा इशाराच मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. 

शासनाच्या नियमानूसार कल्याण डोंबिवली महापालिकेने दुकानावरील प्रमुख नामफलक म्हणजेच पाट्या मराठीत लावा अशा सूचना देत अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल असा इशारा शहरातील दुकानारांना दिला होता. मात्र अद्यापही कल्याण डोंबिवलीत अनेक दुकानदारांचे प्रमुख नामफलक इंग्लिशमध्ये दिसून येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी अद्याप कारवाई सुरू करण्यात आलेले नाही.

त्यामुळे कल्याण मधील मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आदींनी पालिका आयुक्तांची भेट घेत मराठी पाट्याबाबत पालिकेला १२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. व्यावसायिकांनी पाट्या न बदलल्यास बारा वाजवणार असा इशारा देखील जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे.

 

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply