Pune : HSRP नंबर प्लेटसाठी रविवारपर्यंतच अंतिम मुदत; १५ लाख वाहनधारकांवर ३० नोव्हेंबरनंतर कठोर कारवाई

Pune : शहरातील २४ लाखांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य आहे. त्यापैकी सुमारे साडेनऊ लाख वाहनांनीच नंबर प्लेटसाठी नोंदणी केली. सात लाख ५६ हजार ३५६ वाहनांना प्रत्यक्षात नंबर प्लेट लावण्यात आली, तर सुमारे १५ लाख वाहने अद्यापही नंबर प्लेटपासून दूर आहेत. रविवार (ता. ३०) नोंदणीसाठी अंतिम तारीख आहे.

राज्य परिवहन विभागाने वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली. मात्र, पुण्यातील सुमारे ३० टक्के वाहनांनीच नंबर प्लेट लावली आहे. आता कोणत्याही परिस्थिती मुदतवाढ देणार नाही, असे परिवहन विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नंबर प्लेट लावण्यासाठी पुणे आरटीओकडे नोंद असलेल्या २४ लाख २८ हजार ५८९ वाहनांपैकी केवळ सात लाख ५६ हजार ३५६ वाहनधारकांनीच नंबर प्लेट लावली आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत नऊ लाख ४८ हजार ३६९ वाहनांची नोंदणी झाली आहे.

Local Body Election : झेडपी व नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार? आज सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा फैसला

वाहनधारकांचा अपुरा प्रतिसाद, ऑनलाइन नोंदणीत येणाऱ्या अडचणी, उशिरा मिळणाऱ्या नंबर प्लेट, केंद्रचालक वाहनधारकांकडून अतिरिक्त रक्कम घेणे आदी कारणांचा परिणाम नंबर प्लेट लावण्यावर झाला आहे. नंबर प्लेट लावण्याच्या अंतिम मुदतीला काही दिवसच शिल्लक आहेत. यात काही प्रमाणात वाहनांची नोंदणी होईल. मुदतवाढ न मिळाल्यास वाहनांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. अशा वाहनांना एक हजार रुपये दंड होऊ शकतो.

उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ दिली आहे. त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही. आता मुदतवाढ न मिळाल्यास ३० नोव्हेंबरनंतर वाहनांवर कारवाई करणार आहोत.

- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *