
Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला. २ डिसेंबरला नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. २ डिसेंबरला पगारी सुट्टी मिळणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील विविध अस्थापने, व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी सरकारने जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. या निवडणुकांचा पहिला टप्पा येत्या २ डिसेंबरला पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या शासकीय निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी पगारी सार्वजनिक सुट्टी (Paid Holiday) जाहीर केली आहे.
|
Pune : महिला नेतृत्वाला मतदारांची पसंती चाकणमध्ये भाग्यश्री वाडेकर नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर |
ज्या जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबर म्हणजे मंगळवारी मतदान होणार आहे. त्या जिल्ह्यांतील कर्मचारी, अधिकारी आणि कामगार या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी देण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून सांगण्यात आले आहे की, मागच्या वेळी झालेल्या निवडणुकांमध्ये काही आस्थापनांनी पगारी सुट्टी किंवा कामातून वेळ दिला नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. यावेळी तसं घडू नये आणि सर्व पात्र नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील याची खात्री करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मधील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ही सुट्टीची अट त्या सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी लागू असते जे मतदान क्षेत्रातील मतदार आहेत. त्यांचे कामाचे ठिकाण मतदारसंघाच्या आत असो वा बाहेर तरी देखील त्यांना सुट्टी देणे बंधनकारक आहे. कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना, ज्यात कारखाने, दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापने, आयटी कंपन्या, मॉल्स आणि किरकोळ विक्री केंद्रे यांचा समावेश आहे. या सर्वांना निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांना कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी लागणार आहे. जर नियम पाळले नाही तर कारवाई केली जाऊ शकते. पगारी सुट्टी किंवा पुरेसा वेळ न दिल्यास आणि याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

