HMPV Virus : चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान; HMPV व्हायरसचा चिमुकल्यांना धोका

HMPV Virus : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी.तुमच्या मुलांना सांभाळा कारण कोरोना पुन्हा आलाय. चीनमध्ये नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. आणि हा व्हायरस सहा ते १२ वर्षांच्या मुलांसाठी सर्वात घातक आहे. नेमका कसा आहे हा व्हायरस आणि त्यापासून तुमच्या मुलांची कशी काळजी घ्याल त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैंमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षेही उलटले नाहीत तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसने धुमाकूळ घातलाय.. या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर सरकारने चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंय.. मात्र लहान मुलांनाच सर्वाधिक धोका का आहे? पाहूयात.

Atal Setu News : अटल सेतूचा प्रवास होणार अर्ध्या किमतीत, मुंबईकरांना दिलासा; ५० टक्क्यांनी घट

कोरोना आलाय, लहान मुलांना सांभाळा
HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक
रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त
HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो
लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो, मुलांना श्वास घेण्यास त्रास
दमा किंवा ब्रॉन्कायटिससारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका
चीनमध्ये ह्यूमन मेटाप्न्युमोव्हायर या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडलेत... मात्र HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो? पाहूयात.
कसा होतो HMPV चा प्रसार?
खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग
संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग
संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा
मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? पाहूयात.
काय काळजी घ्याल?
मास्क घाला
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
वारंवार हात स्वच्छ धुवा

रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोना प्रमाणेच या विषाणूची माहिती लपवत आहे.. त्यामुळे जगाचं आणखीनच टेंशन वाढलंय. चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळे हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यावर कधीही धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply