HMPV Virus : राज्यात HMPV धडकला, व्हायरसला रोखण्यासाठी पुणे मनपा सज्ज, काय केल्या उपाययोजना?

HMPV Virus : चीनचा HMPV व्हायरसने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान हा व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. नागपूरमध्येही याचे २ संशयित रूग्ण सापडल्याची माहिती आहे. अशातच देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरु केल्या आहेत.

यावेळी रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. पण महापालिकेने दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरु केलेली नाही. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

एचएमपीव्हीचा उद्रेक होणार?

चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोगाचा उद्रेक झाला असून, अनेक राज्यांमध्ये हा व्हायरस पसरलेला आहे. या व्हायरसची लागण बंगळूरमधील एका आठ महिन्यांच्या मुलीलाही झाल्याचे आढळून आलं आहे. भारतात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यानंतर देशातील इतर भागांमध्येही याचे रूग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Shocking News in Mumbai : घरात अख्खं कुटुंब झोपलं होतं, मध्यरात्री मुलीनं ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं आयुष्य

यासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून पुणे महापालिकेलाही खबरदारीसाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. लोहगाव विमानतळावर प्रवाशाची तपासणी सुरू केलेली नाही याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल अस महापालिका अधिकारी यांनी सागितलं आहे.

नागपूरमध्ये सापडले संशयित रूग्ण

सोमवारी महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकलेला HMPV विषाणूने महाराष्ट्रात एन्ट्री केल्याची माहिती आहे. भारतात आतापर्यंत ८ ते १० रूग्ण आढळले आहेत. नागपूरमध्ये HMPV या विषाणूचे दोन संशयीत रूग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आलं आहे.

नागपूरमध्ये दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खासगी रुग्णालयातून माहिती मिळाली आहे. यामध्ये सात वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा समावेश आहे. दोन्ही मुलं सध्या ठणठणीत बरी झालेली आहेत. पण जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल, असे समोर आलेय.

संसर्ग टाळण्यासाठी हे करा

  • खोकला किंवा शिंक येत असेल तोंड व नाक रुमाल, टिश्‍यू पेपरने झाका

  • साबण, पाणी किंवा सॅनिटाझर हात वारंवार धुवा

  • ताप, खोकला, शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा

  • भरपूर पाणी प्या, पौष्टिक पदार्थ खा

  • संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी वायूविजन होईल याची दक्षता घ्या

  • संसर्ग टाळण्यासाठी हे करू नये

    • हस्तांदोलन करू नये

    • रुमाल, टिश्‍यू पेपरचा पुनर्वापर करू नये

    • आजारी लोकांच्या संपर्कात जाऊ नये

    • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये

    • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये

    • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply