Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर अली आहे. प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई  करण्यात येत असून याचा राग मनात धरून वाळू माजियांनी शासकीय निवासस्थानी असलेल्या तलाठ्यांच्या घरावर हल्ला केला. मध्यरात्रीच्या सुमारास वाळू माफियांनी ही दहशत माजविली.

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू माफियांची दादागिरी पाहायला मिळाली आहे, अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल प्रशासनाने पकडल्याचा राग मनात धरून अज्ञात सात ते आठ वाळू माफियांनी औंढा शहरात शासकीय निवासस्थान असलेल्या तलाठ्याच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला आहे. धक्कादायक म्हणजे वाळू माफिया घरावर दगडफेक करत असताना दोन तलाठी घरामध्ये झोपले होते. मात्र औंढा पोलीस  वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने, दगडफेक करणाऱ्या वाळूमाफियांनी पळ काढला. 

MP Pritam Munde : भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

या घटनेत कुणालाही इजा झाली नसली तरी औंढा पोलिसांच्या सतर्कतेने दोन्ही तलाठ्यांचे प्राण वाचले आहेत. मात्र दगडफेकीने शासकीय निवासस्थानाचे मोठ नुकसान झाले आहे. दरम्यान औंढा पोलिसांनी तलाठी विठ्ठल उत्तमराव शेळके यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाळूमाफिया विरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. यापूर्वी देखील हिंगोली जिल्ह्यात महसूल अधिकारी पोलीस व सर्वसामान्य नागरिकांवर वाळूमाफियांनी हल्ले केले आहेत. यानंतर पुन्हा हिंगोलीत वाळू माफियांची दादागिरी सुरूच असल्याचे या घटनेमुळे पुढे आल आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply