Accident In Hingoli : हिंगोलीत भरधाव कार झाडावर आदळली, महिलेसह दोघे ठार; बुलडाण्यातही एसटी-खासगी बसच्या धडकेत महिला ठार

Hingoli : राज्यात अपघात सत्र सुरुच आहे. हिंगोलीत नरसी मार्गावर कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या खाली असलेल्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची मिळत आहे. या अपघातात महिलेसह दोघे ठार झाले आहेत. तर बुलडाण्यातही एसटी आणि खासगी बसच्या धडकेत एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे.

 
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत शनिवारी नरसी मार्गावर भरधाव कार  रस्त्याच्या खाली असलेल्या झाडाला आदळली. त्यानंतर झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अनिरुद्ध तानाजी वानखडे व अर्चना सुभाष वानखडे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

छत्रपती संभाजीनगर येथून उमरखेडकडे जाताना हिंगोलीच्या नरसी जवळ हा अपघात झाला. या अपघातामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे.

बुलडाण्यात एसटी आणि खासगी बसचा भीषण अपघात

बुलडाण्यातही एसटी आणि खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ४४ प्रवाशांनी भरलेली बस ही बुलडाण्यातून निघाली होती. त्यानंतर चिखली ते मेहेकर रोडवरील नांद्री फाट्याजवळ या एसटी बसला खासगी बसने धडक दिली.

या एसटी आणि खासगी  बसच्या  अपघातात एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना मेहेकर येथील सामान्य रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं आहे.

खासगी बस ही मेहेकरला जात होती. स्लीपर कोच बस असल्याने त्यातील झोपलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply