गाेंदियासह अमरावतीत धुव्वाधार पाऊस

गोंदिया/ अमरावती : राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस येईल असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आज (बुधवार) गोंदिया आणि अमरावती येथे खरा ठरला. या दाेन्ही जिल्ह्यात वादळी वा-यासह माेठा पाऊस झाला. 

गोंदिया जिल्ह्यात आज दुपारी तीनच्या सुमारास बहुतांश भागात वादळी वा-यास पावसास प्रारंभ झाला. लखलखत्या उन्हा पासून नागरिकांना मोकळा श्वास मिळला आहे. यंदा मान्सूनचे लवकर आगमन हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विदर्भात आज पासून पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज काही जिल्ह्यात अचूक ठरला आहे. अमरावती शहरात तीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अमरावतीत प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना कडक उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply