Hasan Mushrif : मुश्रीफांना हायकोर्टाचा दिलासा; पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.

शनिवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल ९ तास चौकशी केली. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई प्रकरणात न्यायालयात धाव घेतली. ईडीकडून सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सच पालन करत नसल्याचा दावा करत मुश्रीफ यांनी याचिका दाखल केली आहे. राजकीय विरोधक असलेले किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ यांना टार्गेट करत असल्याचा उल्लेख या याचिकेत केला. त्यावर त्यांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.

ED च्या पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी मुश्रीफ घरात नव्हते. परंतु त्यांची घरी पत्नी आणि इतर कुटुंबीय होते. तब्बल साडे नऊ तास मुश्रीफ यांच्या घरातील कुटुंबियांची चौकशी आणि झाडाझडती सुरु होती. त्यावेळी हसन मुश्रीफ नॉट रिचेबल झाले होते.

सोमवारी ईडीचे पथक कोल्हापुरात असताना हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.ईडीच्या कारवाईविरोधात आपण हायकोर्टात गेल्याचे त्यांनी सांगितले होते. मंगळवारी उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवडे अटक करण्यास मनाई केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply