Hasan Mushrif : मुश्रीफांच्या घरावर पुन्हा EDचा छापा; दीड महिन्यातील तिसरी कारवाई

Hasan Mushrif : गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होत आहे. पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तर घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी सकाळी 7 वाजता दाखल झाले आहेत.

दीड महिन्यामध्ये झालेली ही तिसरी कारवाई आहे. आज सकाळी सात वाजता ईडीचे चार ते पाच अधिकारी आपल्या पथकासह त्यांच्या घरी पोहचले आहेत. पाच गाड्यामधून हे अधिकारी आले आहेत.

मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरी ईडीचे अधिकारी सकाळी 7 वाजता दाखल झाले. याआधी देखील मुश्रीफ यांच्या घरावर आणि बँकेत छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


नेमकं काय प्रकरण?

हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. या कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आले आणि या ते कुठून आणि कसे आले याबाबत माहिती ईडीला मिळालेली नाही. हे पैसे अवैध मार्गाने आले असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली होती. कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने बुधवारी पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करून कागदपत्र जप्त करण्यात आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply