Hardik Pandya : हार्दिक पंड्याचा मोठा कारनामा! पहिल्याच सामन्यात मोडून काढला युवराज सिंगचा रेकॉर्ड

Hardik Pandya : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत विजयी सलामी दिली आहे. पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारतीय संघाने आयर्लंडला ९६ धावांवर रोखलं. त्यानंतर १२.२ षटकात या धावांचा यशस्वी पाठलाग करत पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान या सामन्यात भारतीय संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने माजी भारतीय खेळाडू युवराज सिंगचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये फ्लॉप ठरत असला तरीदेखील तो भारतीय संघाकडून खेळताना अनेकदा सुपरहिट ठरला आहे. आयसीसीच्या स्पर्धेत गोलंदाजीत आणि फलंदाजीत त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ३ गडी बाद केले. यासह त्याने युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

IND Vs IRE : T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजयाने 'श्रीगणेशा', आयर्लंडचा पराभव

हार्दिक पंड्याने आयसीसीच्या लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये ५०० पेक्षा अधिक धावा आणि ३० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. असा कारनामा करणारा तो दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचा स्टार युवराज सिंग अव्वल स्थानी आहे.

मुख्य बाब म्हणजे हार्दिक पंड्याने हा रेकॉर्ड युवराज सिंगसमोर मोडून काढला आहे. ज्यावेळी हार्दिकने हा रेकॉर्ड केला त्यावेळी युवराज सिंग देखील स्टेडियममध्ये उपस्थित होता. युवराजचा रेकॉर्ड हा युवराजसमोरच मोडणं ही हार्दिक पंड्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी युवराज सिंगची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली गेली आहे. तसेच हार्दिक पंड्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं तर त्याने ४ षटकात २७ धावा खर्च करत ३ गडी बाद करून दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply