
Hadapsar Terminal : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हडपसर टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असलेले हडपसर टर्मिनलचे काम डिसेंबरअखेरपर्यंत होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास सुरू होणार असल्यामुळे हरंगुळ एक्स्प्रेससह ८ रेल्वेगाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे हडपसर येथून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या ११ होणार आहे. परिणामी पूर्व पुण्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी ही दोन स्थानके टर्मिनल म्हणून विकसित केली जात आहे. या दोन्ही टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू असून ही कामं डिसेंबरअखेरपर्यंत सुरू केली जाणार आहेत. हडपसर टर्मिनल येथे सध्या तीन फलाट आहेत. या ठिकाणाहून हैदराबाद एक्स्प्रेस, जोधपूर एक्स्प्रेस या दोन गाड्या सुरू आहेत. रिवा एक्स्प्रेस ही गाडी नव्याने सुरू करण्यात आली आहे. येथून डेमू सुरू आहेत. तसेच काही एक्स्प्रेसला हडपसर टर्मिनल येथे थांबा देण्यात आला आहे.
|
Rain Alert : विदर्भात पुढील आठवडाभर पावसाचा इशारा; पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता |
आता हडपसर टर्मिनल येथे दोन नवीन 'स्टेबलिंग लाइन' तयार झाल्या आहेत. त्या मुख्य मार्गासोबत जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी आवश्यक असलेली जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यामुळे हडपसर टर्मिनलचा विकास होत आला आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून विकासाची कामे वेगाने सुरू आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाचा विकास आणि रिमॉडेलिंगचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यावेळी पुणे रेल्वे स्थानक येथून एक्स्प्रेस गाड्या इतर ठिकाणी हलवाव्या लागणार आहेत. त्यापैकी काही गाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये हरंगुळ एक्स्प्रेससह आठ गाड्या आहेत. पुणे-लातूर तेथून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हडपसर रेल्वे स्थानकाचा वापर वाढणार आहे.हडपसर टर्मिनलवरून एक्स्प्रेस गाड्या हळूहळू वाढवण्यात येत आहेत. सध्या जोधपूर, हैदराबाद, रिवा एक्स्प्रेस सुरू आहेत. येथून डेमू गाड्यादेखील सुटतात. या ठिकाणाहून सध्या ६ ते ७ हजार प्रवासी प्रवास करत आहेत.
हडपसर टर्मिनलसाठी खर्च किती?
फलाटांची संख्या- ३
स्टेबलिंग लाइन- २
टर्मिनलसाठी खर्च- ९८ कोटी
सध्या सुटणाऱ्या एक्स्प्रेसची संख्या- ३
प्रवास करणारे प्रवासी- ६ ते ७ हजार
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

