Hadapsar News : भाडेकरूची माहिती सादर करा अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल - रविंद्र शेळके , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

हडपसर : घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरार करून तो पोलीसठाण्यात सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक घरमालकांनी भाडेकरू ठेऊनही त्याची माहिती पोलीसठाण्यात दिलेली नाही. हडपसर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून माहितीपत्रकाद्वारे भाडेकरारासह भाडेकरूची माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे.

त्यामध्ये टाळाटाळ झाल्यास घरमालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिला आहे. नुकतेच कोंढवा येथे दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाडेकरूची माहिती ठेवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अनेक मिळकतदार बंधनकारक असतानाही भाडेकरार करीत नाहीत. तो केला तर पोलीसठाण्यात जमा करीत नाहीत. त्यामुळे अनेक गुन्हेगार अशा ठिकाणी अश्रय घेत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यातून सामाजिक सुरक्षेसह देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे.

Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेचं बचावकार्य कायमचं थांबवलं; ५७ जण अद्यापही बेपत्ता

हडपसर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत भाडेकरार व पोलिसांकडे जमा करायच्या माहिती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी एक पत्रक प्रकाशित करून भाडेकरारासह भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलीसठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबत घरमालकाकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. हे पत्रक पोलिसांनी सर्व सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे.

- रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply