Gurupornima Utsav : गुरूपौर्णिमेचा उत्साह! साईनगरी सजली; शिर्डी, अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी

Gurupornima Utsav : राज्यभरामध्ये आज गुरूपौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळतोय. साईनगरी शिर्डीमध्ये देखील गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. साईनगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. शिर्डीमध्ये सध्या गुरूपौर्णिमा उत्सवामुळे मोठं आनंदाचं वातावरण आहे.

शिर्डीनगरी साईनामाच्या जयघोषाने दुमदुमली

साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीनगरी साईनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलीय. साईबाबांना गुरूस्थानी मानून साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक साई नगरीत दाखल झाले आहेत. साई मंदिर तसेच गुरूस्थान मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीय. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेवून शिर्डीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलाय.

Gadchiroli Heavy Rain : गडचिरोलीत मुसळधार पाऊस; घरांमध्ये शिरले पाणी, चार राष्ट्रीय महामार्गांसह २५ जिल्हा मार्ग बंद

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत. त्यासाठी संपूर्ण शहरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईचरणी लीन होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. दर्शनरांगांमध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे आजही गुरुपौर्णिमेदिवशी साईमंदिरआज दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमधीवर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरातील हजारो गुरुदेव भक्तांची भर पावसातही तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर दर्शनासाठी मोठी गर्दी झालीय. तर गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत आज हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी  झालीय. स्वामी समर्थ महाराजांची पहाटे काकड आरती पार पाडल्यानंतर दुपारी होणाऱ्या नैवेद्य आरतीसाठी भक्तांची रांग लागली आहे. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अक्कलकोट नगरीत तगडा बंदोबस्त दिसून येतोय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply