Gujrat Assembly Election : दुसऱ्या टप्प्यात ५ वाजेपर्यंत सुमारे ५८.५६ टक्के मतदान, आता निकालाकडे लक्ष

Gujrat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज ५ डिसेंबर रोजी पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८.५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.अहमदाबाद, वडोदरा, गांधीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या विधानसभा मतदारसंघांमध्ये 61 राजकीय पक्षांचे एकूण 833 उमेदवार निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत.

दुसऱ्या टप्प्यात साबरकांठा येथे सर्वाधिक ६५.८४ टक्के आणि अहमदाबादमध्ये सर्वात कमी ५३.१६ टक्के मतदान झाले. याआधी 1 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान झाले होते, ज्यात सुमारे 63 टक्के मतदान झाले होते.

निकाल 8 डिसेंबरला

हिमाचलसह गुजरात निवडणुकीचे निकाल ८ डिसेंबरला जाहीर होतील. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात दक्षिण गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 788 उमेदवार रिंगणात होते. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ८२.७१ टक्के मतदान झाले. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम मतदारसंघात सर्वात कमी 47.86% मतदान झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply