Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये पूल कोसळला, एकाचा मृत्यू; VIDEO आला समोर

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. आज तकच्या वृत्तानुसार, या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबले असल्याची शक्यताही वळवण्यात येत आहे.

Ajit Pawar On Maratha Reservation : 'आरक्षण दिलं तर...'; अजित पवारांचं मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील आरटीओ सर्कल येथे या पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान पुलाचा मोठा भाग कोसळून खाली पडला. या अपघातात बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली उभ्या असलेल्या रिक्षा आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक झाली. अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ बचाव पथके रवाना करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेवरून काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुजरात काँग्रेस नेते अमित चावडा यांनी गुजरात सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, पालनपूर आरटीओ सर्कलजवळील ओव्हरब्रिज कोसळला. रिक्षाचालकासह तीन जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आता पुन्हा अधिकारी बदलणार, हेच होणार का? 

दरम्यान, हा गुजरातचा सर्वात उंच पूल असल्याचे बोलले जात आहे. बांधकाम सुरू असताना पूल कोसळल्याने विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या महिन्यातच गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील चुरा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पूल कोसळला होता. त्यामुळे ट्रकसह अनेक वाहने नदीत पडली. हा पूल 40 वर्षांपूर्वीच बांधण्यात आला होता. हा पूल भोगावो नदीवर बांधण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी मोरबी पूल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply