Grampanchayat Election Result : नंदुरबार जिल्ह्याच्या ९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा; राष्ट्रवादी, काँग्रेसला एकही जागा नाही

नंदूरबार : ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून नंदुरबार जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींमध्ये ९ ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला आहे. तर ७ ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. या निकालामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतच्या मतमोजणी पूर्ण झाली असून शहादा तालुक्यात भाजपाच्या वर्चस्व राहिला आहे. तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. १६ पैकीभाजपाला ९ ग्रामपंचायतीवर यश आले आहे. तर ७ जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.शहादा तालुक्यातील निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र अनेक प्रस्थापितांना धक्का देत अपक्षांनी मोठी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे. 

Grampanchayat Election Results 2023 : काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांत राडा, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर क-हाडात तणाव

नुकताच पालकमंत्री पद मिळालेल्या राष्ट्रवादीच्या अनिल भाईदास पाटील यांना या निवडणुकीत मोठा धक्का मानला जात असून, शहादा तालुक्यातील १६  पैकी एकही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची निवडून आलेली नाही. तर तीच परिस्थिती काँग्रेसची देखील झाले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी देखील या निवडणुका प्रतिष्ठेच्या होत्या. परंतु, भाजपाचे स्थानिक अंतर्गत वादामुळे डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाला कमी ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर आमदार राजेश पाटील यांना चांगल्या ग्रामपंचायती मिळून आल्या असल्याने शहादा तालुक्यात भाजपाचे वर्चस्व राहिला असल्याचे दिसून येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply