Gram Panchyat Election Result : ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कौल काँग्रेसच्या बाजुने

Gram Panchyat Election Result : तालुक्यातील लोणी खुर्द व दाभड ग्रामपंचायतीच्या दोन जागेसाठी रविवारी (ता पाच ) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे.. तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी मतमोजणी करण्यात आली.लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी उभे असलेल्या प्रसेनजीत लोणे यांना २७६ मते मिळाली तर त्यांचें प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यपाल लोणे १५३मते मिळाली.

दाभड ग्रामपंचायतीची पोटनिवडणुकीत संगिता दिपक दादजवार ह्या विजयी झाल्या त्यांना २१७ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मिरा अरविंद पांचाळ. १७५ मते मिळाली.संगिता दिपक दादजवार ह्या ४२ मतांनी विजयी झाल्या आहेत..या मतमोजणी प्रक्रियेत विस्तार अधिकारी विश्वनाथ मुंडकर, तलाठी रवी, तलाठी मोटे, गिरीश गलांडे, विजय निकम यांनी सहभाग नोंदविला.

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील गटाने खाते उघडलले, कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांना धक्का

विजयी उमेदवार प्रसेनजीत लोणे बीटेक असुन तालुक्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत.त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात जल्लोष केला.यावेळी राजेश लोणे,सुदाम लोणे, विजय लोणे, यशवंत लोणे, बळीराम शिंदे,भूजंग लोणे, बाळू लोणे, प्रभाकर लोणे आदी उपस्थित होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply