Gosikhurd Dam : सावधान ! 'गोसीखुर्द'चे सर्व 33 दरवाजे उघडले, चंद्रपूरसह गडचिरोलीला बसणार बँक वाॅटरचा फटका

Bhandara News : गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून सुमारे 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सतत धो धो कोसळणा-या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले आहेत. गोसे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसे धरणाचे संपूर्ण 33 वक्रदार यावर्षी पहिल्यांदाच उघडण्यात आली आहेत.

या 33 दरवाज्यातून 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान याचा फटका लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 41,243.21 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

भंडारा शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नदीनाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले आहे. सततच्या पावसामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण यंत्रणा सतर्क असून नदीकाठी असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply