Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक संकटात सापडले! ग्रामस्थांचा रोष अन् गिरीश महाजनांनी काढला पळ

Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि संकटमोचक म्हणून ओखळले जातात. राजकीय पेच, आंदोलने, नाराजीनाट्य असो किंवा विरोधकांची कोंडी करायची असो गिरीश महाजन आपल्या चातुर्याने सर्वांवर मात करतात. म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक अशी त्यांची खास ओळख आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संकटमोचक गिरीश महाजन यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले अन् थेट दुचाकीवर बसून पळ काढावा लागला. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजप नेते गिरीश महाजन हे जळगावमधील जामनेर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. दोन दिवसांपूर्वी ते जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी या गावातील रस्त्यांची स्थिती फारच वाईट असल्याचे निदर्शनास आले. यावरुनच गिरीश महाजन यांना स्थानिक तरुणांनी जाब विचारला. तरुणांचा हा आक्रमकपणा पाहून गिरीश महाजन यांनी कोणतेही उत्तर न देता दुचाकीवर बसून त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

दरम्यान, "ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला...' जामनेर तालुक्यात एकच चर्चा." असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर केला आहे.

Pune : डॉक्टर अजित रानडेंना गोखले इन्स्टिट्युटच्या कुलगुरु पदावरुन तडकाफडकी हटवलं

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ग्रामविकास मंत्र्यांच्या जामनेर मतदार संघामधील रस्त्यांची फारच वाईट स्थिती दिसून येत आहेत. याच खराब रस्त्यांबाबत गावातील तरुण त्यांना जाब विचारतांना दिसत आहेत. मात्र, गिरीश महाजन त्यांना उत्तर न देता दुचाकीवर बसून याच चिखल असलेल्या खराब रस्त्यातून वाट काढत निघून जातात. गिरीश महाजन यांच्या या कृतीवरुन स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply