Girish bapat Death : 'गिरीश बापट अमर रहे'; बापटांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा उसळला जनसागर

Girish Bapat Death : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वसमावेशक नेता आणि भाऊ अशी त्यांची ओळख होती आणि पुण्यात त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यामुळेच त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांसह पुणेकरांनी गर्दी केली आहे.

पुण्यातील शनिवार पेठेत त्यांचं घर आहे. या घराच्या आवारत अनेक नागरिकांनी गर्दी केली आहे. 'गिरीश बापट अमर रहे', अशा घोषणा कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी देत आहे. गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी गिरीजा, मुलगा गौरव आणि सून स्वरदा आणि नात असा परिवार आहे. त्यांचं सांत्वन करण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट दोघेही व्यवसायाने वकील आहेत. मुलगा राजकारणात सक्रिय नाही मात्र सून राजकारणात सक्रिय आहे. त्या पुण्यातील अनेक कार्यक्रमात हजेरी लावतात. शिवाय गिरीश बापट यांच्यासोबतही अनेक कार्यक्रमात त्या दिसत होत्या. बापटांच्या जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

कार्यकर्त्यांची गर्दी...

खासदार गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी तरुण कार्यकर्त्यांपासून तर गिरीश बापटांचं कार्य जवळून अनुभवणारे कसब्यातले ज्येष्ठ नागरिकांनीदेखील गर्दी केली आहे. त्यासोबतच महिलांनीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. त्यांच्य़ा जाण्याने भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि पुणे पोरकं झालं आहे, असं म्हटलं जात आहे.

नेतेमंडळींनी घेतलं अंत्यदर्शन

गिरीश बापट यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेत्यांनीही गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपचे स्थानिक नेते आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीदेखील मोठी गर्दी केली आहे. अनेक नेत्यांनी साश्रु नयनांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.

कुटुंबियांचं सांत्वन...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply