Gaurikund Landslide : गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, ३ जणांचा मृत्यू; प्रशासनाचे सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन

Gaurikund Landslide: उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे डोंगरावरून आलेल्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्यालगतची दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले. या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये 4 स्थानिक लोक आणि 16 नेपाळी वंशाचे लोक होते. एसडीआरएफकडून शोध मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी गौरीकुंड धरण पुलियाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली 20 जण दबले गेले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 17 जणांना शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळपासून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 100 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) कर्मचारी स्थानिक प्रशासनाच्या पथकासह शोध मोहिमेत गुंतले आहेत. ड्रोनचाही वापर केला जात आहे.

Nashik Devendra Fadnavis : भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज : उपमुख्यमंत्री फडणवीस

प्रशासनाने केले सावध राहण्याचे आवाहन -

गौरीकुंडजवळ दरड कोसळण्याच्या घटनेनंतर उत्तरकाशीच्या सीमावर्ती जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सर्व लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूस्खलन होण्याच्या प्रवण भागात सुरक्षित रहदारीची काळजी घ्यावी, पावसात अजिबात बाहेर नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. उत्तरकाशी जिल्हा पोलिसांनीही एक सूचना जारी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply