Ganeshostav 2023 : मुंबईत 10 दिवस रात्रभर बिनधास्त फिरा, गणेशोत्सवात रात्री विशेष बसेसची सोय

Ganeshostav 2023 : मुंबईसह राज्यात गणेशोत्सव सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. गणेशोत्सवात 10 दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यांतून गणेशभक्त मुंबईत दाखल होतात. गणेशोत्सवात मुंबईत रात्रीही मोठी गर्दी पाहायला मिळते.

मुंबईतील अनेक मंडळाचे गणपती, विद्युद रोषणाई, डेकोरेशन पाहण्यासाठी नागरिक रात्रीचे मुंबईत फिरतात. अशा गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने या दहा दिवस विशेष बसेसची सोय केली आहे.

मंगळवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी बेस्टतर्फे 19 ते 27 सप्टेंबर या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत 27 बसेस सोडण्यात येणार आहेत. 

सीएसएमटी ते सायन, वरळी ते काळाचौकी, नागपाडा ते ओशिवरा, शिवडी ते दिंडोशी, पायधुनी ते विक्रोळी, नागपाडा ते शिवाजी नगर, म्युझियम ते देवनार, गिरगाव ते सँडहर्स्ट रोड स्टेशन आणि म्युझियम ते शिवडी या विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply