Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर 'कथकली'नं गणेशभक्तांचे वेधले लक्ष

Ganesh Visarjan Festival 2023 : पुण्यातल्या गणरायाच्या विसर्जनाची साऱ्या राज्यभर जोरदार चर्चा होत आहे. त्यात सहभागी झालेले वेगवेगळे कलाकार यांनी गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. वादक, गायक याशिवाय नर्तक कलाकारांनी देखील उपस्थित गणेशभक्तांची उस्फुर्त दाद मिळवल्याचे दिसून आले आहे.

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु असताना त्यातील सहभागी वेगवेगळ्या कलाकारांनी नागरिकांना थक्क केले आहे. त्यातील प्रणव या कथकली कलाकारानं उपस्थितांची मनं जिंकून घेतल्याचे दिसून आले. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये प्रणवनं कथकली सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही खूप काही सांगून जाणारा होता.

Mumbai News : गणपती विसर्जनासाठी तैनात तरुणावर वीज कोसळली; जुहू समुद्र किनाऱ्यावरील घटना

पुण्यातील गणेशोत्सव हा देशभरातील गणेशभक्तांसाठी, कलाकारांसाठी आणि हौशी पर्यटकांसाठी देखील उत्सुकतेचा विषय असतो. या गणेशोत्सवाचा आणि खासकरुन विसर्जन मिरवणूकीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण बाहेर देशातूनही येत असतात. अशावेळी विविध मंडळाकडून गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीची जय्यत तयारी केली जाते. त्यातील सहभागी ढोलपथकं, लेझीम अन् झांज पथके यांचीही जोरदार चर्चा होत असते.

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीत पहिल्यांदात आपली कला सादर करणाऱ्या प्रणवनं सांगितले की, मी मुळचा पुण्याचा असून भरतनाट्यममध्ये पुणे विद्यापीठातून एम.ए केले आहे. पहिल्यांदाच मला अशाप्रकारे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी खूपच भारावून गेलो आहे. कथकलीचे सादरीकरण गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये पहिल्यांदाच करता आले याचे विशेष अप्रुप आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply