Ganesh Visarjan : आज लाखो पुणेकर अलका चौकात होणार नव्या इतिहासाचे साक्षीदार

Pune Ganapati Visarjan Updates : सकाळापासून राज्यसह पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदा दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांसह विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. त्यामुळे नागरिकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यामध्ये वेगळा उत्साह पाहण्यास मिळत आहे. मात्र, आजच्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत लाखो पुणेकर अलका चौकातील एका नव्या इतिहासाचे साक्षीदार होणार आहे.

परंपरेनुसार अलका चौकात येणाऱ्या गणेश मंडळांच्या स्वागताची जबाबदारी ही महापौरांची असते मात्र, यंदाच्या वर्षी महापौरपदाचा कार्यकाळ संपल्याने आणि अद्यापपर्यंत निवडणूका न झाल्याने पुण्यासह प्रमुख महापालिकांवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा अलका चौकात मंडळाचं स्वागत महापौरांऐवजी आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते केले जाणार आहे.

पुण्यातील आतापर्यंत विसर्जन मिरवणुकीतील इतिहासात अशाप्रकारे आयुक्तांनी गणपती मंडळांचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आज अलका चौकसह सर्व पुणेकर एका नव्या इतिहासाचे साक्षीदार होणार असून, लवकरात लवकर पुण्यासह प्रमुख महानगरांमध्ये पालिका निवडणुकांचे बिगूल वाजू देत हीच आशा राजकीय नेत्यांसह लाखो सामान्य पुणेकरांच्या मनात असणार असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply