Gadchiroli Heavy Rain : गडचिरोलीत मुसळधार पाऊस; घरांमध्ये शिरले पाणी, चार राष्ट्रीय महामार्गांसह २५ जिल्हा मार्ग बंद

Gadchiroli : नागपूर विदर्भात पावसाने हाहाकार माजविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात देखील मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. दरम्यान जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील राधे बिल्डिंग परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. 

राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. प्रामुख्याने विदर्भात सगळीकडे पावसाने पाणीच पाणी झाले आहे. नागपूर शहरात देखील सर्वदूर पाणी साचले आहे. हीच परिस्थिती गडचिरोली शहरात देखील पाहण्यास मिळत आहे. दरम्यान काल रात्रीपासून सकाळपर्यंत मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू होती. तर सध्या रिमझिम पाऊस सुरू असला तरी अनेक नदी- नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तर पावसामुळे शहरी भागातही नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. 

BJP Meeting Pune: भाजपचं पुण्यात महाअधिवेशन! अमित शहा, नितीन गडकरींची उपस्थिती; विधानसभेचे रणशिंग फुंकणार

गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून सध्या गंभीर पूरपरिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे अनेक भागात दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. तर दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झाले आहेत. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली- नागपूर, गडचिरोली- आष्टी, भामरागड- आल्लापल्ली व आल्लापल्ली- सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह २५ जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply