गडचिरोली: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या नावे बनावट लेटरहेड आणि स्वाक्षरीचा वापर करून, जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीअंतर्गत ४ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी खोटे प्रशासकीय मान्यता आदेश (PRMA) तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार आणि चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याला २८ जूनच्या मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत.
नेमके प्रकरण काय? २२ जून २०२६ रोजी जिल्हा खनिज विभागातील एका ऑपरेटरला दोन प्रशासकीय मान्यता आदेशांच्या पीडीएफ फाईल्स प्राप्त झाल्या. हे आदेश खोटे असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. तपासणीअंती जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि लेटरहेड बनावट असल्याचे स्पष्ट झाले. १५ ते २२ जून दरम्यान या बनावट पीडीएफ फाईल्स सोशल मीडियावर आणि संबंधित वर्तुळात फिरवल्या जात होत्या. यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्याचा किंवा शासनाचा निधी लाटण्याचा कट होता, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
राजकीय कनेक्शन आणि तपास: अटक करण्यात आलेला आशिष पिपरे हा भाजपचा माजी जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष होता, मात्र पक्षाने तीन महिन्यांपूर्वीच त्याची हकालपट्टी केल्याचे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. पिपरेने यापूर्वी एका माजी राज्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचे (PA) काम केले असून, या राजकीय ओळखीचा वापर करून त्याने प्रशासकीय यंत्रणेत आपले जाळे विणल्याचा संशय आहे.
पुढील कारवाई: पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पिपरेच्या अटकेमुळे तपासाला वेग आला आहे. मोबाईल कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस या कटातील इतर सहभागी व्यक्तींचा शोध घेत आहेत. या घोटाळ्यात आणखी 'मोठे मासे' गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आता तपास यंत्रणेसमोर आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




