Gadchiroli Ajit Pawar : कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

Gadchiroli : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकाला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय भूकंपामुळे त्यांच्यावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीकेची झोड सुरु आहे. अशात टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गडचिरोलीतील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 'कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही', असं त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे.

गडचिरोलीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकताच शपथ घेतलेले नवे मुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आहेत. या कार्यक्रमात भाषण करतानाअजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला यामागचे कारण देखील सांगितले आहे. 'आम्ही भाजप-शिवसेना सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विकासासाठी घेतलाय. नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाला साथ देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही.', असं अजित पवार यांनी सांगितलं.

'मोदींच्या नेतृ्त्वात देश वेगाने पुढे जात आहे. केंद्रात आणि राज्यात अनेक विकासीची कामं वेगाने सुरु आहेत. देशाचे आणि राज्याचे सरकार एकाच विचाराचे असेल तर काम जलद होते. सर्वसामान्यांची कामं व्हावीत हेच महायुती सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. हे पैसे जनतेपर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत पोहचला पाहिजे.', असे त्यांनी सांगितले.

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'मुख्यमंत्री सक्षम नेतृत्व आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समन्वय ठेऊन कामे करा. लोकांनी आम्हाला भरभरून पाठिंबा द्या.', असे आवाहन अजित पवारांनी केले. तसंच,'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला हा कार्यक्रम घेतला. त्यामुळं महाराष्ट्रात सर्व भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल ही खात्री देतो.', असे देखील त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply